Mission Career
Your Success Starts with Us

अपयश आले तरी घाबरू नका; हिंमतीने पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी हे वाचायला हवं!

0

स्पर्धा परीक्षेला एकदा अपयश आले म्हणून कित्येक जण पुन्हा परीक्षेला बसत नाहीत.पण मित्रांनो,अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे अगदी खरे आहे.26 वर्षांची रुची बिंदल हिला स्पर्धा परीक्षेत चार वेळा अपयश आले पण तिने पाचव्यांदा यशाची पायरी गाठली.चार वेळा अपयश पत्कारल्यानंतरही यश कसे मिळवावे? किंवा यावर मात कशी करावी? याविषयी रुची विद्यार्थ्यांना आवर्जून सल्ला देतात.

यूपीएससी पूर्व परीक्षेच्या संदर्भातील सल्ला-
१) मुद्दे आणि विषय व्यवस्थितपणे समजून घ्यावा.
२)जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करावा.
३)सर्वात आधी ज्या प्रश्नांची उत्तरे माहिती आहेत ती लिहावेत.
४) ज्या प्रश्नांबाबत साशंकता आहे त्या प्रश्नांना सोडवावे.
५)एकाच प्रश्नामध्ये जास्त वेळ वाया घालवू नये.

यूपीएससी मुख्य परीक्षेच्या संदर्भातील सल्ला-
१) अभ्यासक्रमानुसार अभ्यासाचे वेळापत्रक तयार करावे.
२) कमी वेळेत जास्त चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा.
३)एकदा वाचून झाल्यानंतर वारंवार त्याची मॉक टेस्ट करावी.
४) मॉक टेस्टचा सराव अधिक माहितीपर व उपयुक्त ठरतो.
५) जितका लिहिण्याचा सराव करतील तितका त्यांचा चांगला अभ्यास होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.