Mission Career
Your Success Starts with Us

नंदिनी UPSC मध्ये देशात अव्वल ; मित्रांनी केली चेष्टा पण तिचा ध्यास आणि प्रामाणिकपणा ठरली प्रेरणा…

0

शिक्षणाचा ध्यास आणि प्रवास….
कर्नाटकमधल्या कोलार जिल्ह्यातील एका शिक्षकाच्या मुलीनं इतिहास घडवलाय. नंदिनी यांनी इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण पूर्ण केलं. तत्पूर्वी, त्यांचं शालेय शिक्षण सरकारी शाळेत झालं होतं. त्यांना १२वीमध्ये ९४.८३ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्यांनी एसएम रामय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. पण, त्यांना साहित्यामध्ये रुची होती.
इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण झाल्यानंतरही त्यांनी यूपीएससीमध्ये कन्नड साहित्य हा विषय ऑप्शनल ठेवला होता.

नंदिनी यांचा खडतर प्रवास
नंदिनी यूपीएससीची परीक्षा टॉप रँकने पास होणार, अशी मित्र-मैत्रिणी चेष्टा करायचे. पण, परीक्षेचा निकाल लागला आणि मित्र-मैत्रिणींची चेष्टा खरी ठरली. नंदिनी यांचा टॉपर होण्याचा प्रवास अतिशय खडतर होता. त्यांनी २०१४मध्ये यूपीएससीची परीक्षा पहिल्यांदा दिली होती. त्यात त्या ६४२व्या रँकेने पास झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भारतीय महसूल खात्यात नोकरी सुरू केली. पण, टॉप रँकने आयएएस ऑफिस होण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळं त्यासाठी स्पेशल कोचिंग घ्यायला सुरुवात केली. तत्पूर्वी दोन वर्षे पीडब्लूडीमध्येही त्यांनी नोकरी केली होती.

अनोखा आणि प्रेरणादायी प्रवास-
आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महसूल सेवेची नोकरी मिळाल्यानंतरही अभ्यास सुरू ठेवल्यानं नंदिनी यांची चेष्टा केली जायची.कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्वप्नाशी तडजोड करण्यास तयार नसलेल्या त्या तरुणीनं २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षेचं आव्हान पार केलं. ती केवळ ही परीक्षा पास झाली नाही तर, तिनं देशात पहिला क्रमांक मिळवला. पण, त्यांनी देशात पहिला क्रमांक मिळवून सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावली. आज, प्रत्येकजण त्यांच्या यशाचं आणि कष्टाचं कौतुक करत आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना संदेश…
यूपीएससी परीक्षेसाठी बेसिक नॉलेज अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. तुम्ही तुमचे धेय्य निश्चित केले असले आणि त्यासाठी तुमची कष्टाची तयारी असेल तर तुम्हाला तुमचं धेय्य निश्चितच गाठता येतं. पीडब्ल्यूडीमध्ये काम करताना ग्राऊंड लेव्हलवर सरकारी कामाची पद्धत पाहिली होती. त्यामुळं आयएएस अधिकारी होऊन समाजाची आणखी चांगली सेवा करता येईल, असा विचार करूनच परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.