Mission Career
Your Success Starts with Us

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मिळणार आर्थिक सहाय्य

0

‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २०२० साठी आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी संधी आहे.

कोणाला मिळणार?

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत.

योजनेचे स्वरूप कसे आहे?

पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल.

पात्रता –
१) उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2020 करिता पात्र असावा.

अर्ज कसा करावा?

१) https://bit.ly/3rMnBoG या लिंक वर जावून फॉर्म भरता येईल.

२) NOTICE BOARD> BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2020 Online Application Form )

कागदपत्रे-
अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व त्यासोबत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 चे प्रवेश पत्र (Admit Card) इ. च्या स्व-साक्षांकित प्रती अपलोड कराव्यात. कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख– दि. 20 एप्रिल 2021

निवडप्रक्रिया कशी‌ होईल?
मुलाखत-
बार्टी मार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी Mock Interview घेतले जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल असे बार्टीमार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-
०२०-२६३४ ३६00/२६३३ ३३३९

Leave A Reply

Your email address will not be published.