Mission Career
Your Success Starts with Us

शेतकरी कुटुंबातील लेक झाली (PSI) पोलीस दलात उपनिरीक्षक

0

परिस्थिती आणि वातावरण कोणतेही असलं तरी हिंमतीच्या जोरावर जग जिंकता येतं.हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.शेतकरी कुटुंबातील मुलगी, अभ्यासात हुशार आणि शिकवणी शिवाय प्रमाणिक व सातत्यपूर्ण अभ्यास अशी ही तेजल आहेर पोलीस दलात उपनिरीक्षकपदी मुंबई येथे 7 एप्रिल रोजी रुजू होणार आहे.

पोलीसांची वर्दी आणि कष्टाचे मोल…

तेजल आहेर हिचे निफाड तालुक्यातील वाहेगाव भरवस हे गाव आहे.तशी घरची परिस्थिती बेताची असल्याने क्लास कधी लावलाचं नाही.स्पर्धा परीक्षेचा कसलाच क्लास न लावता स्वतःच्या हिंमतीवर अभ्यास सुरू केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी नाशिक येथे राहून केली.2017 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी तेजल आहेर पात्र ठरली.आयोगामार्फत निवड झाल्यानंतर तिचं नाशिक येथे पोलीस अकदामीत प्रशिक्षण झाले.तिला कोणतेही मार्गदर्शन नसले तरी तिच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी बरीच होती.तिने सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अभ्यास केला. अभ्यासाच्या काळात सण आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं टाळलं.दिवसभर फक्त आणि फक्त अभ्यासासाठी अहोरात्र मेहनत केली आणि पोलिसांची वर्दी अभिमानाने मिळवली.

तिचा घराला आणि गावाला अभिमान…

खेडेगावातील शिक्षण आणि जीवन‌ असले तरी तिने स्वप्नांमध्ये भरारी घेतली.लहानपणापासून खेड्यात वाढली तरी आता तेजल आहेर 7 एप्रिलला मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू होत आहे.
या यशामुळे ग्रामस्थांनी तिच्या जिद्द आणि मेहनतीला सलाम ठोकला.तिचे यश आणि कष्ट जगासमोर नवी प्रेरणा निर्माण करणारे ठरले.

मित्रांनो,
नुसती स्वप्न बघून चालत नाही तर ती पुर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत देखील आवश्यक असते.

Leave A Reply

Your email address will not be published.