Mission Career
Your Success Starts with Us

एका कानाखालीने जगणं शिकवल, PSI चाँद हमजा मेंढके यांची जीवनकहाण !

0

आपल्या आयुष्यातील काही प्रसंग हे आयुष्यभर लक्षात राहतात.तेचं प्रसंग आयुष्यभरासाठी शिकवण देऊन जातात.असाच एक प्रसंग एका तरूणाच्या बाबतीत घडला.त्या प्रसंगामुळे आज तो पोलिस उपनिरीक्षक आहेत.ही कथा प्रेरणादायी कथा आहे. एका धडपडणाऱ्या,ध्येयाकडे आस लावून बसलेल्या चाँद हमजा मेंढके या तरूणाची…

चाँद हमजा मेंढके हे हातगाड्यावर फळविक्री करायचे. एका ट्राफिक हवालदाराने त्यांना कानाखाली मारली. पोलिसांनी त्यांना सुनावलं पण की,गाडा रस्त्याच्या बाजूला हटवला.हाच राग,अपमान त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला‌.मग त्यांच्या सरकारी अधिकारी होण्यासाठी प्रवास सुरू झाला.चाँद हमजा मेंढके यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती.

त्याचे बालपण व शालेय शिक्षण एका छोट्या खेडेगावात गेले.उस्मानाबाद शहरापासून आठ किलोमीटरवरील समुद्रवाणी हे चाँद हमजा मेंढके यांचे गाव. त्यांच्या कुटुंबात सारेजण शेती करायचे. पण ही सगळी कोरडवाहू शेती.त्याला बारावी २००६ मध्ये ७४ टक्के गुण मिळाले.त्याला शिक्षक व्हायचे होते पण काही डीएडला नंबर लागला नाही.एकूणचं घरची परिस्थिती बेताची होती.तरीही त्याची जिद्द ताकदी होती.

परंतु पुढील शिक्षण घेण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही. त्यांनी उस्मानाबाद शहरात फळांचा गाडा सुरू केला. फळविक्रीचा व्यवसाय करत त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्यांच्या आयुष्यातील हा पोलिसांसोबतचा प्रसंग त्यांना आयुष्यभर लक्षात राहिला‌.येथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांचे ध्येय निश्चित झाले. त्यांनी पोलिस होण्याचा निश्चय केला होता. त्यांनी २००८ मध्ये झालेल्या पोलिस भरतीत त्यांना यश आले आणि ते पोलिस शिपाई झाले.

२००८ ते २०१७ या कालावधीत ते उस्मानाबाद, उमरगा, भूम येथे पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. पोलिस म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासीठीची तयारी सुरूच ठेवली. मागील आठवड्यात त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. फळविक्रेता ते पोलिस नाईक,पोलिस नाईक ते पोलिस उपनिरीक्षक हा त्यांचा प्रवास कित्येकांना लक्षात राहणारा आहे.माणसाची परिस्थिती कायम सारखी राहत नाही.त्याला कष्टाची जोड असली की यश मिळवणं सोपं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.