Mission Career
Your Success Starts with Us

पॉवरग्रिड पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासाची स्थापना झाली

0

भारतीय पॉवरग्रिड महामंडळ (PGCIL) या सार्वजनिक कंपनीने त्याच्या ‘InvIT’ म्हणजेच पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यासाची स्थापना केली आहे. त्याला ‘पॉवरग्रिड पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास’ असे नाव देण्यात आले आहे.

महत्वाचे :

  • वीज क्षेत्रात एखादा सार्वजनिक उपक्रम प्रथमच InvIT पद्धतीच्या माध्यमातून त्याच्या मालमत्तेचे परीक्षण करून मालमत्ता पुनर्वापराचे कार्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्याद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर नवीन आणि निर्माणाधीन भांडवल प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.
    ‘InvIT’ याच्या माध्यमातून सध्याच्या विशेष उद्दिष्ट वाहनासाठी (SPVs) निश्चित केलेल्या दराच्या आधारे स्पर्धात्मक बोलीसाठी मालमत्तांमधून पॉवरग्रिडला मोबदला घेता येणार.
  • पॉवरग्रिड ‘InvIT’ याच्या माध्यमातून कमाई करण्यासाठी दराच्या आधारे स्पर्धात्मक बोली, ज्या निर्माणाधीन किंवा भविष्यात कंपनीकडून अधिग्रहण केली जावू शकतात अश्या विशेष उद्दिष्ट वाहनासाठी मोबदला घेणार आहे, हे भारत सरकारच्या निर्देशानुसार आणि निश्चित लक्ष्यानुसार करण्यात येणार.
  • पहिल्या टप्प्यामध्ये पॉवरग्रिड 5 मालमत्तेतून जवळपास 7164 कोटी रुपयांची कमाई करू शकणार आहे.

पॉवरग्रिड :

भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेला पॉवरग्रिड हा एक सार्वजनिक उपक्रम असून त्याच्या व्यावसायिक कामकाजाला वर्ष 1992-93 मध्ये सुरुवात झाली. ही एक महारत्न कंपनी आहे, जी वीज पारेषणच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.