Mission Career
Your Success Starts with Us

पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर,पदवीच्या परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा जाहीर करण्यात आल्या असून यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा देता येणार आहेत.

विद्यापीठाकडून नुकत्याच राज्यशास्त्र विभाग, डिफेन्स स्टडीज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याप्रमाणेच मे महिन्यामध्ये विद्यापीठातील प्रत्येक विभागाशी संलग्न असलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा देता येणार आहेत.

गेल्या वर्षीही करोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यापीठाला या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्या लागल्या होत्या. तेव्हा पहिल्यांदाच ऑनलाइ परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यंदा परीक्षांपूर्वी विद्यापीठाने सराव परीक्षा घेतल्या होत्या. याच काळात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने परीक्षांच्या कालावधीबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता परीक्षांची वेळापत्रके जाहीर व्हायला सुरुवात झाल्याने हा संभ्रम दूर झाला आहे. विद्यार्थ्यांना ‘मुडल’ या ऑनलाइन प्रणालीद्वारे परीक्षा देता येणार असून, परीक्षांचा कालावधी एक ते दोन तासांचा असणार आहे. बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.