Mission Career
Your Success Starts with Us

चहा पावडर विकणारी महिला अब्जाधीश ; वार्षिक उलाढाल पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल

0

समाजात अजूनही असे म्हटले जाते की,स्त्रियांचे विश्व फक्त चूल आणि मूल यावर मर्यादित आहे.पण या वाक्याला पायल यांनी खोडून काढले आहे.ही प्रेरणादायी गोष्टी आहे.पायल मित्तल अग्रवाल या महिलेची…

व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल 2 कोटी रुपये!
एक स्त्री उत्तम उद्योजक होऊ शकते.हे त्यांनी पटवून दिले आहे.सुरुवातीला त्या सिलिगुडी येथे राहत होत्या.पण सध्या त्या गुरुग्राम येथे राहतात.आधीपासूनच पायल यांना शिक्षणात रस नव्हता.काही कारणांमुळे त्या आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करु शकल्या नाहीत. त्यांच्या घरच्यांनी पायल यांना शिक्षण पूर्ण करण्याचे सांगितले मात्र, अभ्यासात त्यांचे मन लागले नाही. त्यांनतर त्यांचे लवकरच लग्न झाले. त्यांना मुलही लवकर झाले. असे असूनसुद्धा पायल यांनी स्वप्न उराशी बाळगून एक रेस्टॉरंट सुरु केले. मात्र, यामध्ये त्यांना फारसे यश आले नाही. त्यांनतर पायल यांनी चहा पावडर तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला.त्यांच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल 2 कोटी रुपये आहे.

कल्पना आणि इच्छाशक्तीच्या जोरावर चहा पावडर विकून केला कोट्यधीश, वार्षिक टर्नओव्हर!
खरंतर एखादी कल्पना ही कित्येक गोष्टींना जन्म देत असते.अशीच कल्पना पायल यांना सुचली.त्यातून हा व्यवसाय सुरू झाला.त्या एकदा युरोपमध्ये फिरायला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी येथे विक्रीसाठी असलेली दार्जिलिंगची जगप्रसिद्ध असलेली चहा पावडर पाहिली. याच ठिकाणी त्यांना एक भारतीय महिला भेटली. ती सुद्धा युरोपमध्ये भारतीय चहा पावडर विकत होती. त्यानंतर पायल यांनीसुद्धा चहा पावडर विकण्याचे ठरवले. त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला 7 लाख रुपयांची गुंतवणूक करुन त्यांनी सर्व यंत्रणा उभारली. त्यानंतर अपार मेहनत करुन त्यांनी आपल्या व्यवसायात जम बसवला. त्या एकूण 100 पेक्षा जास्त प्रकारचे चहा पावडर उत्पादित करतात. त्या ग्रे टी, ग्रीन टी, कहवा, जॅस्मीन टी, अँटी स्ट्रेस टी, मसाला टी, डेटॉक्स टी अशा अनेक प्रकारच्या चहांसाठी त्या चहा पावडर उत्पादित करतात.सध्या त्यांच्या या चहा पावडर विकण्याच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर 2 कोटी रुपये आहे.छोट्या व्यवसायात सुद्धा कोटींची उलाढाल होऊ शकते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

मित्रांनो,शिक्षणात जरी रस नसेल,नोकरीची संधी मिळत नसेल तर निराश होऊ नका.अशा प्रकारच्या कल्पना कोट्यवधी रुपये मिळून देऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.