Mission Career
Your Success Starts with Us

ऑस्कर पुरस्कार 2021 : 93 वा अकॅडमी पुरस्कार

0

विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट – ‘नोमडलँड’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – क्लोई झाओ (‘नोमडलँड’ चित्रपटासाठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – फ्रान्सिस मॅकडॉर्मंड (‘नोमडलँड’ चित्रपटासाठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अँथनी हॉपकिन्स (‘द फादर’ चित्रपटासाठी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – यूह-जुंग यून (73 वर्षीय दक्षिण कोरियाई अभिनेत्री)
जीन हरशॉल्ट ह्यूमनिटेरियन अवॉर्ड – टेलर पॅरी आणि ‘द मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन फंड’
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म – ‘सोल’
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट (फीचर फिल्म) – ‘एनादर राउंड’

महत्वाचे :

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावणारे 83 वर्षीय अँथनी हॉपकिन्स हे सर्वात वयस्कर अभिनेते ठरले आहेत.
    यूह-जुंग यून या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या अभिनेत्री आणि आशिया खंडातील दुसऱ्या अभिनेत्री ठरल्या आहेत.
  • क्लोई झाओ या ऑस्करच्या इतिहासात दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळालेल्या त्या द्वितीय तर प्रथम आशियाई महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत.

ऑस्कर पुरस्काराविषयी

“ऑस्कर पुरस्कार” या नावाने ओळखला जाणारा अकादमी पुरस्कार हा अमेरिकेतल्या चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा आणि चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी दिला जातो.

संस्था : ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ (AMPAS)

श्रेणी : 24 कलात्मक आणि तांत्रिक पुरस्कार श्रेणींमध्ये दिला जाणारा वार्षिक पुरस्कार.

पुरस्कार स्वरूप : विजेत्याला पुतळ्याचे सन्मानचिन्ह (अकॅडेमी अवॉर्ड ऑफ मेरिट) दिले जाते.

कधी पासून सुरवात : दिनांक 11 मे 1927 रोजी ‘अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेची स्थापना झाली. प्रथम पुरस्कार सोहळा 1929 साली आयोजित केला गेला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.