Mission Career
Your Success Starts with Us

नोकरी सोडून तिने घेतली व्यवसायात झेप ! आता आहे कोट्यवधीचा व्यवसाय, वाचा प्रेरणादायी प्रवास

0

स्त्री घरासोबत सर्वकाही सांभाळू शकते.तेही तितक्याच आवडीने, चिकाटीने आणि मेहनतीने.नीता अदप्पा यांनी चाकोरीबद्ध आयुष्यातील जगणं सोडून नव्या हिंमतीने कोट्यवधीचा व्यवसाय चालू झाला आहे.त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊयात‌‌‌….

बालपणापासून अभ्यासू वृत्ती…

नीता या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांचे वडील एकां हर्बल प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीत सेल्स मॅनेजर होते. नीता यांनी मुंबईतील एका महाविद्यालयातून फार्मसीमध्ये मास्टर्सची डिग्री घेतली. त्यानंतर पुढचं शिक्षण घ्यावं, शिक्षणासाठी परदेशात जावं किंवा नोकरी करावी हे तीन पर्याय होते. त्यांनी तिसरा पर्याय निवडत नोकरीस सुरुवात केली.

अवघ्या सहा महिन्यातच नोकरीला केला रामराम!

त्यांचं नोकरीत मन रमलं नाही आणि अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी नोकरीला रामराम केला. त्यानंतर त्यांनी बेंगळुरूत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.10 हजार रुपये गुंतवून व्यवसायाला सुरुवात केली.1995मध्ये स्त्रियांनी नोकरी सोडून काम करणं तसं शक्य नव्हतं. कारण त्या काळात संधी खूप कमी होत्या. तरीही नीता यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून त्यांचा व्यवसाय वाढवला.

हर्बल नावाच्या कंपनीला सुरूवात…

या कामात त्यांना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण अनिशा देसाई यांनी साथ दिली. दोघींनीही हेअर केयर, स्क्रीन प्रॉडक्ट्सवर बरंच संशोधन करून 10 हजार रुपये गुंतवून व्यवसायाला सुरुवात केली.सुरुवातीला केवळ हॉटेलांना टारगेट केलं. त्यांना बंगळुरूच्या छोट्या हॉटेलमधून ऑर्डर मिळायला लागले. मात्र, त्यावर त्या थांबल्या नाहीत. त्यांनी पंचतारांकीत हॉटेलांकडेही मोर्चा वळवला. तिथूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्यांची उत्पादने या पंचतारांकीत हॉटेलातही जाऊ लागले. त्यामुळे त्यांचा बिझनेस आपोआपच वाढला.फेस स्क्रब, हेअर मास्क, हेअर ऑयल, शँम्पू, कंडिशिनर प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली.त्यांचा हा धाडसी, जिद्दी प्रवास कित्येकांना बळ देणारा ठरू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.