Mission Career
Your Success Starts with Us

राज्यातील परिस्थिती पाहून ठरणार MPSC आणि MBBS परीक्षेच्या पुढील तारखा‌…

0

कोरोना रोगाची महामारी दिवसेंदिवस वाढत असल्याने परीक्षांचे वेळापत्रक देखील विस्कळीत होताना दिसत आहे.कोरोना रूग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत चालली आहे.अशावेळी 11 एप्रिल म्हणजे रविवारी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी पालक यांच्याकडून करण्यात येत होती. ही मागणी आणि परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेता राज्य सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर MBBSच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.

परीक्षा होणार कधी? याबाबत मुख्यमंत्र्यांचे मत-

या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

वयाच्या अटी संबंधित विशेष बाब-

परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाची ही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.