Mission Career
Your Success Starts with Us

आई-वडील हक्काचे आधारस्तंभ आयुष्यातून गेले पण हिंमतीने दिली कायमस्वरूपी साथ!

0

मणिकंदन नावाचा तरूण चेन्नईमध्ये राहतो.त्याचे वडील तो केवळ दुसऱ्या इयत्तेत असताना वारले.काही काळाने आईने देखील स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली.आयुष्य ज्या माणसांनी दाखवले.तिचं माणसं आपल्या आयुष्यातून निघून गेली.याशिवाय दुसरे दु:ख काय असू शकते?पण मणिकंदन खूप हिंमतीने उभा राहिला आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन लागला.सध्या तो अम्बत्तूर औद्योगिक क्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे.अशा या प्रेरणादायी माणसाच्या प्रवासाचा आढावा….

बालपणीपासूनच दुःखाचा डोंगर पण स्वप्नांनी दिला आधार…

मणिकंदन गरीब घरात जन्माला आला.त्याची परिस्थिती तशी बेताचीच असायची.तो दुसरीत असताना त्याचे वडील वारले.मग आईने एकटीने त्यांला मोठं केलं.त्यावेळी आईनं काळजावर दगड ठेवत त्याला अनाथालयात पाठवलं. इथून त्याला शाळेत पाठवलं गेलं. त्याची आई त्याला भेटायला येत असे.अनाथालयाचे केअरटेकर परिभास्कर यांनी त्याच्यासाठी डॉक्टर शोधला. त्या डॉक्टरनं मणिकंदनच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च उचलायची तयारी दाखवली.पण ज्या आईने शाळेची अभ्यासाची ओळख करून दिली होती.तिनेच एक दिवशी आत्महत्या केली.तेव्हा त्याच्यावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला.

लहानपणीपासूनच पोलीस अधिकारी व्हायचे होते…

तो म्हणतो की,मी अनेक लहान मुलांना बालपणातच वाया जाताना पाहिलं आहे. मी माझं अनाथालय आणि परिभास्कर या दोन्हींचा खूप आभारी आहे. त्यांच्यामुळंच आज मी इथं आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर करून घेतला.तेवढाच मन लावून अभ्यास केला.क्रिमिनॉलॉजी विषयात पुढचं शिक्षण घेत पारंगत झाला. 2007 मध्ये त्यानं सशस्त्र रिझर्व पोलीस दलात नोकरीचा अर्ज केला. निवड झालेल्या 13 हजार उमेदवारांमध्ये मणिकंदनचा क्रमांक होता.यात तो ४२३ व्या क्रमांकवर आला.सध्या तो अम्बत्तूर औद्योगिक क्षेत्राच्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे.त्याने हे स्वप्न बघितले होते.पण फक्त स्वप्न बघून थांबला नाहीतर ते पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील घेतली.वाईट गोष्टींवर मात करत हे यश संपन्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.