Mission Career
Your Success Starts with Us

महाराष्ट्रात 5वी, 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा लांबणीवर

0

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची तीव्रता पाहता राज्य शिक्षण मंडळाने 10वी च्या परीक्षा रद्द करत 12 वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. आता या पाठोपाठ 23 मे ला होणारी इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा देखील लांबणीवर टाकल्या आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी यंदाची स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 25 एप्रिल 2021 रोजी आयोजित केलेली होती मात्र कोरोना वायरस संकटामुळे ती 23 मे दिवशी होणार आहे. असे सांगण्यात आले होते पण आता पुन्हा कोरोना संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी)व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल.

यंदा राज्यभरातून शिष्यवृत्ती परीक्षेकरिता एकूण47,662 शाळांनी नोंदणी केली आहे. इयत्ता 5 वीचे 3,88,335 तसेच इयत्ता 8 वीचे 2,44,143 असे एकूण 6,32,478 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. पण कोविड मुळे आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान यंदा 1ली ते 9 वी च्या सार्‍या विद्यार्थ्यांनाही परीक्षेविना वर्गोन्नती देण्याचा निर्णय झाला आहे.

स्कॉलरशीप परीक्षेमध्ये भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन विषयांच्या प्रत्येकी 100 गुणांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यानंतर राज्यभरातून अव्वल विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून स्कॉलरशीप धारकांची यादी जाहीर केली जाते. यामध्ये प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्नावली असते. सार्‍या विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.