Mission Career
Your Success Starts with Us

JEE Main जेईई मेन २०२१ मे सत्राची परीक्षा लांबणीवर

0

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन २०२१ मे सत्राची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने यासंबंधी नोटीस जारी केली आहे.

एप्रिल नंतर आता जेईई मेन मे सत्राची परीक्षा देखील लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा २४ ते २८ मे २०२१ या कालावधीत होणार होती. दरम्यान, जेईई एप्रिल सत्र परीक्षाही यापूर्वी स्थगित करण्यात आली आहे. केवळ फेब्रुवारी आणि मार्च सत्राच्या परीक्षा झाल्या आहेत.

जेईई मेन मे २०२१ सत्रासाठी नोंदणी सुरू करण्यात आली नव्हती. एनटीएने सांगितले की नोंदणीची तारीख नंतर घोषित केली जाईल. सोबत विद्यार्थ्यांना असा सल्लाही दिला आहे की हा अतिरिक्त वेळ विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करण्यासाठी उपयोगात आणावा. NTA Abhyas App च्या माध्यमातून घरबसल्या मॉक टेस्टचा सराव करा.

एनटीएने सांगितले आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधीच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी ऑफिशियल वेबसाइट्स nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in वर भेट देत राहावी. जेईई मेन संबंधी कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी ०११-४०७५९००० वर किंवा [email protected] वर ईमेल द्वारे संपर्क साधण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.