Mission Career
Your Success Starts with Us

मुंबईची लेडी सिंघम ! 14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी दोन मुले तरीही IPS चे स्वप्न जिद्दीने केले पूर्ण…

0

शिक्षणाचा ध्यास, कामासाठीची जिद्द आणि चिकाटी असेल तर जग जिंकता येतं हे अगदी खरं आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे आयपीएस अंबिका.
यांचा खडतर प्रवास जाणून घेऊयात…

परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले

आयपीएस अंबिका यांचे मूळ गाव तमिळनाडू येथे आहे.यांचे लग्न वयाच्या १४ व्या वर्षीच झाले होते, तसेच वयाच्या १८ व्या वर्षी अंबिका आई बनल्या होत्या.पण त्यांच्या जिद्दीला सलाम!अंबिका यांचे शिक्षण पुर्ण नव्हते, त्यामुळे त्यांनी आपले शिक्षण पुर्ण करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले दहावीचे आणि बारावीचे शिक्षण पुर्ण केले त्यानंतर त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले.अंबिका ज्या गावात राहत होत्या त्या ठिकाणी एवढ्या सोई-सुविधा नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या पतीने राहण्याची सोय चेन्नईमध्ये केली. पती मुलांना सांभाळत नोकरी करत होत्या.त्यांचे पती पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

तीनवेळा अपयश पदरी
अंबिका आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत घेत होत्या, पण तीनवेळा अंबिका यांना अपयश आले. पतीने तिला परत बोलावून घ्यायचा निर्णय घेतला, पण शेवटचा एक प्रयत्न करत असल्याचे अंबिका यांनी म्हटले.डिंडीगुलमध्ये आयपीएस परिक्षेसाठी कोणतेही कोचिंग सेंटर नव्हते. अशातच अंबिकाने चेन्नईमध्ये राहून सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करण्याचे ठरविले. अंबिका आयपीएसची परिक्षा एकदा नाही तर तीनदा नापास झाल्या. मात्र, त्या हरल्या नाहीत. अखेर अंबिका यांची मेहनतीला यश मिळाले, २००८ च्या आयपीएस लिस्टमध्ये अंबिका यांचे नाव आले. अंबिका यांची पहिली पोस्टींग महाराष्ट्रातच झाली होती, २०१९ मध्ये त्या डीएसपी म्हणून नियुक्त झाल्या.

लेडी सिंघम म्हणून ओळख
आयपीएस अधिकाऱ्याचे ट्रेनिंग पूर्ण केल्यावर त्यांना पहिली पोस्टिंग महाराष्ट्रात मिळाली. आज अंबिका या मुंबईच्या झोन-४ च्या डीसीपी आहेत.त्यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते.

मित्रांनो, परिस्थिती कोणतीही असली तरी त्यावर जिद्दीने‌ मात करता आली पाहिजे.प्रामाणिकपणा,सत्याची कास आणि अभ्यासू वृत्ती असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते.

Leave A Reply

Your email address will not be published.