Mission Career
Your Success Starts with Us

आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन: 22 एप्रिल

0

पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 एप्रिल या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन’ (वसुंधरा दिन) जगभर साजरा करतात.

वर्ष 2021 मधील आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिनाची संकल्पना “रिस्टोअर अवर अर्थ” ही संकल्पना होती.

पार्श्वभूमी :

  • पर्यावरणाच्या रक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचे आमदार गेलॉर्ड नेल्सन ह्यांनी 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे अमेरिकेत आयोजन केले होते. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेत पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेले डेनिस हेस ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेनी 1990 साली 141 देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला.
  • सध्या 1970 साली स्थापन करण्यात आलेल्या ‘अर्थ डे नेटवर्क’ या संस्थेच्या समन्वयाने 175 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. 2009 साली संयुक्त राष्ट्रसंघानी 22 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.

महत्वाचे :

  • हरित वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण 1990 साली आलेल्या पातळीच्या 50 टक्क्यांहून अधिक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संघटनेनी नमूद केले आहे. वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी 7 दशलक्ष मृत्यू होत आहे.
  • हवामानविषयक ठोस कृतीमुळे 2030 सालापर्यंत आर्थिक लाभ 26 महादम (लक्ष कोटी) अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचू शकतो आणि शाश्वत ऊर्जेवर लक्ष्य केंद्रित केल्यास केवळ ऊर्जा क्षेत्रातच 18 दशलक्ष अधिक रोजगार निर्माण होऊ शकतात.
  • अश्या परिस्थितीत अक्षय ऊर्जा, हरित इमारत संकल्पना, स्वच्छ तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक वाहने यांचा अवलंब करणे ही काळाची गरज ठरीत आहे. तसेच तळागाळातल्या समुदायांनी वृक्षारोपणासारखे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेणे आणि नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनासाठी त्यांचा कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाचा मंत्र अवलंबवणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.