Mission Career
Your Success Starts with Us

भारताच्या ४८ वे सरन्यायाधीश पदी एन.व्ही. रमणा

0

माजी सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ ग्रहण केली. रमणा हे 26 ऑगस्ट 2022 पर्यंत म्हणजेच पुढील 16 महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील.

सरन्यायाधीस एन. व्ही. रमणा यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबतच उपराष्ट्रपती वंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कायदामंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. रमणा 2022 मध्ये सेवानीवृत्त होणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. रमणा हे 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर रुजू होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. सरन्यायाधीश पदावर पोहचणारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे एन व्ही रमणा हे पहिले न्यायमूर्ती ठरलेत.

कोण आहेत एन व्ही रमणा?

  • सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांचं पूर्ण नाव नथापलपती वेंकट रमणा असं आहे. त्यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील पोन्नवरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला
  • १० फेब्रुवारी १९८३ रोजी त्यांनी वकील म्हणून या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यांनी याआधी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनदेखील काम पाहिलं. तसंच आंध्र प्रदेशच्या न्याय अकादमी अध्यक्षाच्या रुपातही काम केलं
  • न्यायमूर्ती रमणा १० मार्च २०१३ पासून २० मे २०१३ पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांची दिल्ली उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश म्हणून २०१३ साली नियुक्ती झाली
  • जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सुविधा पुरविण्याचा त्यांचा निर्णय गेल्या काही वर्षांतील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चित निर्णयांपैकी राहिला
  • २६ ऑगस्ट २०२२ रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.