Mission Career
Your Success Starts with Us

आयएएस होण्यासाठी सोडली लाखो रुपयांची नोकरी!

0

आता सगळीकडे स्पर्धा परीक्षेचे वातावरण दिसून येत आहे.काही जण सरावात रमले आहेत तर काही जण अजूनही परीक्षेबाबत चिंतेत दिसून येतात.या काळात प्रेरणादायी गोष्टी ऐकून नव्याने सुरूवात देखील करता येते.काही विद्यार्थ्यांची या परीक्षेतून अधिकारीपदावर निवड होते तर काही जण पुन्हा एकदा परीक्षेच्या तयारीला लागतात. यूपीएससीतून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी पदावर काम करताना मिळणार सन्मान ही बाब युवकांसाठी प्रेरणादायी ठरते.अशाच एका मुलाचा प्रवास जाणून घेणार आहोत.हा युवक जरा खास आहे‌.धीरज कुमार यांनी आयएएस होण्यासाठी लाखो रुपयांची नोकरी सोडली.

लोकांची मदत करण्यासाठी आयएएस होण्याचा निर्धार

धीरज कुमार यांची परिस्थिती तशी बेताचीच होती पण अभ्यासू वृत्ती आणि हिंमत बरीच होती.त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडीचं शिक्षण घेतलं.धीरज यांचे वडिल दुसऱ्या शहरामध्ये नोकरी करत होते. धीरजकुमार यांची आई आजारी असायची त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागत असे.अशा प्रकारे सारखं जाण्यासाठी त्यांना देखील परवडणार नव्हतं.बदलीचा प्रस्ताव देखील वरिष्ठांना नाकारला.पण यांनी हिंमत हारली नाही.स्वत:वर आलेली वेळ दुसऱ्यावर यायला नको म्हणून आयएएस होण्याचा निर्धार घेतला.

पहिल्या प्रयत्नातच घवघवीत यश…

धीरज कुमार यांनी बंगळुरुमध्ये आयएएस परीक्षेची तयारी केली. 2019 ची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. डॉक्टरची नोकरी सोडून धीरज कुमार यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. 5 लाखांपर्यंतची कमाई करण्याची संधी होती. मात्र, आयएएस बनण्यासाठी पाच लाख रुपयांची ऑफर धुडकावली.यात त्यांना पहिल्या प्रयत्नात घवघवीत आले.

Leave A Reply

Your email address will not be published.