Mission Career
Your Success Starts with Us

आई-वडिलांसोबत डोक्यावर पाटी ठेऊन भाजी विकणारा मुलगा झाला UPSC परीक्षा उत्तीर्ण..

0

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे गावच्या एका जिद्दी तरुणाने हे यश संपादन केले आहे.आई-वडिलांसोबत बारावीपर्यंत डोक्यावर पाटी ठेऊन भाजी विकणाऱ्या या पठ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.चला तर मग त्याचा प्रवास जाणून घेऊयात….

तडवळे गावच्या ग्रामस्थांची मान उंचावली!

गोपीनाथ कांबळे यांना जेमतेम दीड एकर शेती आहे. अगदी खेड्यातील
शरण गोपीनाथ कांबळे ( राहणार तडवळे , तालुका बार्शी ) असे त्या युवकाचे नाव आहे. तब्ब्ल १८ ते २० तास अभ्यास करून त्याने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठवा क्रमांक घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.मुलाला अधिकारी बनविण्यासाठी अहोरात्र मजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी मात्र आपल्या कष्टाचे सार्थक झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

खासगी कंपनीचे वीस लाखाचे पॅकेज नाकारले….

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण यशवंतराव चव्हाण प्रशाला तडवळे, या आपल्या मूळगावातच पूर्ण केले. त्यानंतर, बारावीचे शिक्षण विद्या मंदीर वैराग तर वालचंद कॉलेज इंजिनिअरींग कॉलेज सांगली येथे २०१६ मध्ये बी.टेक झाले. पुढील शिक्षणासाठी इंडीयन इन्स्टुट ऑफ सायन्स बेंगलोर मधून २०१८मध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केली. एम.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका खासगी कंपनीने वीस लाखाचे पॅकेज देऊ केले होते पण शरण यांनी ते पॅकेज नाकारले.

नोकरी न करता….सरकारी सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न!

आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना, शरणने पहिल्याच प्रयत्नात आपलं स्वप्न सत्यात उतरवलं.शरणने ऑगस्ट २०१९मध्ये पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि ते देशात आठव्या क्रमांकांने उत्तीर्ण झाले सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सद्वारे विविध दलामध्ये भरती केली जाते.शरण हा सीएपीएफ असिस्टंट कमांडंट परीक्षेमध्ये पाहिल्याच प्रयत्नात देशात आठवा आला आहे.या परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF, सेंट्रल रिर्झव्ह पोलीस फोर्स CRPF, सेंट्रल इंडी स्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स CISF, इंडो -तिबेटीयन बॉर्डर पोलीस IT BP, सशस्त्र सीमा बल SSB या दलामध्ये निवड केली जाते. मुलगा मोठा अधिकारी झालाय, पण ही वस्तुस्थिती आजही आई-वडिलांना स्वप्नासारखीच वाटतेय.

मित्रांनो,
गाव असो की परिस्थिती कोणत्याही अडचणी प्रसंगी प्रामाणिकपणे अभ्यास करून यश गाठता आले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.