Mission Career
Your Success Starts with Us

MPSC परीक्षेने जगणं शिकवलं; आता त्याच्या कंपनीचा महिन्याला दहा लाखांचा टर्नओव्हर!

0

खरंतर हे शीर्षक वाचून समजले नसेल ना की स्पर्धा परीक्षा आणि टर्नओव्हर यांचा काय संबंध पण याचा एकमेकांसोबत बराच वाटा आहे.दिपक सिसाळ हा तरूण देखील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अहोरात्र मेहनत करून झटपट करत होता.पण यश मात्र आले नाही.मग त्याने धरली व्यावसायिक होण्याकडे वाट आणि तिकडून सुरू झाला प्रेरणादायी प्रवास….

आई-वडिलांनी कधी निर्णय लादले नाहीत…
दिपक सिसाळ हा तरूण गेली बरीच वर्षे स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी धडपडत होता.घरची परिस्थिती जरी मध्यमवर्गीय असली तरी त्यांच्यावर कधीच घरच्यांनी दबाव आणला नाही.त्यांने वयाच्या एका टप्यावर निर्णय घेतला आणि बाहेर पडून या स्पर्धेत उतरायचे.मग त्यानुसार तयारी देखील करू लागला.त्याच्यासाठी त्याचे चुलत भाऊ घरातलेच दोन्ही चुलत भाऊ PSI झालेले होते. त्यामुळे त्यांना त्याच्याशिवाय MPSC मध्ये असं वेगळे कोणी आयडॉल नव्हतं. जे दोघे होते ते घरचेच होते. त्यातला एकाने त्यांना सांगितले होते की, पुण्यात येण्याची काही गरज नाही कोल्हापुरात माझी ओळखीची आहेत.तिकडे चांगला अभ्यास होईल.स्पर्धा परीक्षेसाठी हा खरा प्रवास सुरू झाला.

पुण्याकडून कोल्हापुरकडे प्रवास!
दिपक सिसाळ सांगतात की,आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून MPSC करायचा निर्णय घेतलेला. त्यांची दहावी पर्यंतची शाळा पलूस मध्ये झाली. अकरावी बारावी आर्ट्स मध्ये झाली कारण MPSC मुळे ते अकरावी, बारावी आर्टस् मधेच करायचे ठरलेलं होते, पण आर्टस् तस कमीपणाच समजलं जायचं म्हणून बारावीनंतर BBA केले. कारण जरा English चा एक टच पण मिळतोय. BBA करायचं खरं कारण म्हणजे त्याकाळी एक क्रेझ होती. ती म्हणजे BCA आणि BBA ची. आणखीन महत्वाचं म्हणजे Engineering एवढं ते अवघड नाही आणि आर्टस् एवढं कमी नाही.त्याचं BBA झालं ते सांगलीतल्या चिंतामणराव कॉलेज मध्ये. ते झाल्यावर घराकडं आलो होतो. MPSC तर करायची असली तर सगळे पुण्याला जायचे पण मी कोल्हापूरला गेलो.पण तिकडे त्यांचे मन काही रमले नाही मग त्यांनी अभ्यासासाठी पुणे गाठले.

डोक्यात चोवीस तास एकच, ते म्हणजे MPSC एके MPSC.

सहा महिन्यातच पुण्यात राहिले. पुण्यात जोरदार अभ्यास सुरू केला आणि दिड महिन्यात PRE काढली. पुण्यात कोणताच क्लास लावला नव्हता. जो काय क्लास करायचा तो कोल्हापुरात झालेला. तसेच भावांच्या मार्गदर्शनाखाली क्लास न लावता अभ्यास सुरू केला. त्याच्या जीवावरच पहिली PRI काढली. तो सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान मी लायब्ररीत जायचा. ११ ते १२ वाजेपर्यंत तिथेच असायचे.त्यांच्या डोक्यात प्री, मेन्स, क्लास, लायब्ररी, पुस्तकं इतकच असायचं. हे सगळ चार वर्ष चालू होतं. त्या चार वर्षात प्री झाल्या. त्यात पास झाले. मेन्स पण पास झाले. पण शेवटपर्यंत कधी पोहचणे शक्य झाले नाही.दुर्देवाने म्हणा नायतर सुदैवाने पण एकपण पोस्ट निघाली नाही.त्यामुळे त्यांना नैराश्य आले.गावात येवून फक्त शेती करत राहणं उपयोगाच नाही याची जाणीव होती.त्यांची बागायती शेती होती. ती पण २० एकर. या शेतीला धरुन आपण काहीतरी बिझनेस करायला हवा असा डोक्यात विचार येत होता.मग त्यांनी व्यवसायात पाऊल टाकले.

सुरू झाली व्यावसायिक म्हणून सुरूवात…
त्यांचा वडिलांचा इंजिनीरिंगचा व्यवसाय MIDC मध्ये होता. १९९८ नंतर त्यांनी तो भाड्याने देऊन टाकला होता. एके दिवशी त्यांचा भाऊ फुड प्रोसेसिंग एग्झिबिशन पहायला गेलेला. त्याने तिथे फुड प्रोसेसिंगची माहिती घेतली.त्यांच्या घरचे सगळेच पहिल्यापासून सपोर्ट करण्यासाठी असायचे. भावाने सांगितलं आपण टॉमेटोवर प्रोसेसिंग करायला हवी. पुर्वी त्याच्या शेतात टॉमेटो घ्यायचो. हे टॉमेटो कधी २ रुपये किलो जायचे तर कधी ६० रुपये किलो.आपल्या मालावर आत्ता आपणच प्रोसेसिंग करायला हवं हे जाणलं. सुरवातीला जागा आणि बिल्डिंग असून साधारण ८० लाख ते १ करोड पर्यंतची इन्व्हेस्टमेंट होती. MIDC मध्ये असणाऱ्या जागेवर आणि बिल्डिंगवर ६० लाख रुपयांचे कर्ज मिळाले. लोकांना वाटतं ६० लाखांचे कर्ज मिळाले यात कसला संघर्ष आला पण आयुष्यात कधीच काही न बोललेले आईवडिल, भावाचा असणारा विश्वास आणि त्यात MPSC सोडून आपण घेतलेला वेगळा निर्णय या सगळ्यांमध्ये अपेक्षांच ओझे त्यांच्यावर सर्वात जास्त होतं. त्यामुळेच रात्रीची झोप उडून गेलेली. त्यांनी १९ ऑक्टोंबर २०१६ ला शेवटी हा बिझनेस सुरू केलं. १९ ऑक्टोंबरला बिझनेस चालू झाला आणि ८ नोव्हेबरला नोटबंदी झाली. सुरू केलेला बिझनेस बसतोय अस वाटायला लागलं. बिझनेस ज्या व्यक्तींबरोबर होते ते साधारण होलसेल व घावूक व्यापारी असायचे. रोजची आवकजावक असल्याने त्यांचा सगळा व्यवहार कॅशमध्ये व्हायचा. पण मार्च एडिंग नंतर हळुहळु सुरळीत व्हायला लागलं. हळुहळु बिझनेस सेट करत गेलो.ते सांगतात की, आजचं सांगायच झालं तर आजचा टर्नओव्हर महिन्याला दहा लाख आहे. आज माझ्याकडे २५ लोक काम करतात. या २५ जणांचा पगार ६ हजारांपासून ३० हजारांपर्यंत आहे. पण एवढे सारे असूनही ‌त्यांना अजूनही स्पर्धा परीक्षा खुणावत आहे.

मित्रांनो,अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे अगदी खरे आहे.वारंवार येणाऱ्या अपयशाला सामोरे जाण्याची आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी ठेवायलाच हवी.

Leave A Reply

Your email address will not be published.