Mission Career
Your Success Starts with Us

कराडच्या चारुदत्त साळुंखे यांनी UPSC ESE परीक्षेत मारली बाजी

0

ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आता यशाचा मान ठरून कित्येकांना प्रेरणा देत आहेत.याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे होय.तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC)अभियांत्रिकी सेवा परीक्षेत विभागात देशात पहिला आला आहे.त्याचा हा प्रवास कित्येकांना मार्गदर्शनपर ठरेल आणि नक्कीच बळ देईल.

खाजगी क्षेत्रात जॉब न करण्याचा निर्णय;शासकीय सेवा निवडली!

चारुदत्त साळुंखे याला पहिल्यापासून शिक्षणाची प्रचंड आवड आहे.शालेय शिक्षण असो की महाविद्यालयीन शिक्षण असो‌…त्यांनी उत्तरोत्तर प्रगती केली.दहावीनंतर SGM कॉलेज कराड येथून 92.33 टक्क्यांसह विज्ञान शाखेतून त्यानं बारावी पूर्ण केली. बारावी विज्ञान शाखेतूनच MHT-CET परीक्षेत 184 गुण मिळवून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली.यानंतरही या हुशारीमुळे त्याला खाजगी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी झाली.पण खाजगी कंपन्यामधून नोकरीच्या संधी हातात असताना देखील खाजगी क्षेत्रात जॉब न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

शासकीय सेवेत अधिकारी होण्याचं एकमेव ध्येय!
तंत्रज्ञान संशोधन म्हणजेच टेक्नीकल रिसर्च इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भाभा अनुसंशोधन केंद्रातील मुलाखत सर्वात कठीण समजली जाते.त्याने GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून ४८ वा क्रमांक मिळवला होता. या यशाच्या जोरावरच सबंध देशाच्या टेक्निकल क्षेत्राला दिशा देणाऱ्या भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी त्याची निवड झाली.

कठिण परीक्षांचा प्रवास…

UPSC – IES ची मुख्य परीक्षा देखील चारुदत्त पास झाला होता. दरम्यानच्या काळात भाभा रिसर्च सेंटरची मुलाखत आणि UPSC मेन्स परीक्षाच्या अवघ्या एक महिना आधी चारुदत्तचे वडील कोरोनाशी झुंज देऊन घरी परतले होते. अशा कठीण प्रसंगातही संयम न गमावता कुटुंबियांची काळजी घेत त्यानं मेन्सची आणि मुलाखतीची तयारी पूर्ण केली. दरम्यानच्या काळात त्याची भाभा रिसर्च सेंटरमध्ये( BARC) मध्ये निवड झाली. त्यानंतर अवघ्या एक महिन्यात UPSC च्या मुलाखतीसाठी तो पात्र ठरला.एवढेच नाहीतर देशात पहिला देखील आला‌.

अभ्यासात सातत्य असायला हवं !
त्याने कधीच परिस्थितीचा दिखावा केला नाही.तर अभ्यास आणि कामावर लक्ष केंद्रित केलं.तो दिवसभर अभ्यासात मग्न असायचा.यासाठी कुटुंबातील प्रत्येकाने त्याला साथ दिली.त्यामुळे भाभा रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून काम करत असतानाच आज मिळालेले देशपातळीवर दैदिप्यमान यशाबद्दल चारुदत्त साळुंखे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मित्रांनो,
ग्रामीण भाग असो की शहरी,आर्थिक परिस्थिती कशी पण असली तरी ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा‌.ध्येयाच्या दिशेने झपाटल्यासारखी वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते हेच चारुदत्त साळुंखे यांच्या यशाचं गमक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.